Talegaon Dabhade: धामणेतील 27 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा मृत्यू, मावळ तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 35

Talegaon Dabhade: 27-year-old corona-infected woman dies in Dhamne Mavla, 16 active patients in Talegaon Dabhade मावळातील कोरोनाबाधितांची शहरी 30 व ग्रामीण 50 अशी एकूण संख्या 80 झाली असून त्यापैकी 04 जणांचा मृत्यू झाला.

0

एमपीसी न्यूज- धामणे (ता. मावळ) येथील रहिवासी असलेल्या 27 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाला असून तालुक्यातील कोरोना बळीची संख्या चार झाली आहे. तर सक्रिय रूग्णांची संख्या 35 आहे, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत आज अखेर 23 पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या झाली आहे.

दरम्यान, आज रविवार (दि 28) तळेगाव येथील 59 वर्षीय महिला व लोणावळा (डोंगरगाव) येथील 21 वर्षीय तरूण अशा दोन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद झाली आहे, असे तहसीलदार बर्गे यांनी सांगितले.

धामणे येथील 27 वर्षीय महिलेला 23 जूनपासून श्वसनाचा त्रास व इतर तक्रारी होत्या तसेच आधीपासूनच मधुमेह व ह्रदयविकाराचा त्रास होता. त्यामुळे ही महिला 23 जूनपासून खासगी रूग्णालयात उपचार घेत होत्या.

खासगी रुग्णालयातून त्यांना (दि 26) रोजी तळेगाव जनरल हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. शनिवारी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्या महिलेचा स्वॅब घेण्यात आला होता. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी सांगितले.

मुंबई (चेंबूर) येथून 16 जून रोजी आलेल्या, दि 25 जून रोजी मृत्यू झालेल्या 70 वर्षीय व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील त्याच्या भावाची पत्नी (भावजय) त्यांचे राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान केंद्राच्या कोविड केअर सेंटरमध्ये संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले होते.

त्यांचा स्वॅब शनिवार (दि 27) घेण्यात आला होता. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी सांगितले.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील आज अखेर 23 पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या झाली आहे. त्यापैकी 6 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले असून सक्रिय रूग्णांची संख्या 16 आहे. एकाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड व प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. प्रवीण कानडे यांनी सांगितली.

मावळातील कोरोनाबाधितांची शहरी 30 व ग्रामीण 50 अशी एकूण संख्या 80 झाली असून त्यापैकी 04 जणांचा मृत्यू झाला. 41 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सक्रिय रूग्णांची संख्या 35 आहे, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली आहे.

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालल्याने मावळकरांच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक बाब आहे. मावळात कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like