Talegaon Dabhade : टोलनाक्यावर थांबलेल्या वाहनातून 32 साड्यांची चोरी

एमपीसी न्यूज – साड्या घेऊन जाणारे वाहन टोलनाक्यावर थांबले असता अज्ञात चोरट्यांनी वाहनातून 32 साड्या चोरून नेल्या. ही घटना रविवारी (दि. 24) पहाटे पावणेपाचच्या सुमारास उर्से टोलनाक्यावर घडली.

नथू नामदेव पाटील (वय 66, रा. सुरत. मूळ रा. शिरपूर, धुळे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नथू साड्यांच्या गाडीवर चालक म्हणून काम करतात. ते रविवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास उर्से टोलनाक्यावर आले. त्यांनी टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी गाडी थांबवली आणि लघुशंकेसाठी बाहेर गेले. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी गाडीच्या मागील बाजूचा दार कापून 4 हजार 960 रुपये किमतीच्या 32 साड्या चोरून नेल्या. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.