Talegaon Dabhade: मावळात अडकलेले 53 कामगार भंडारा, नाशिकमधील मूळगावाकडे रवाना

Talegaon Dabhade: 53 workers stranded in Maval leave for their native place in Bhandara, Nashik

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात संचारबंदीमुळे अडकलेल्या 53 कामगारांना घेऊन तीन एसटी बस आज भंडारा, नाशिक येथे पाठविण्यात आल्या. लॉकडाऊनच्या काळात अनेक कामगारांना घरी जाण्याची आस लागली होती. त्यामुळे नवलाख उंब्रे, आंबी परिसरातील कामगारांची घरी जाण्याची व्यवस्था करण्यात आली. 

स्वगृही परत जाण्याचा आनंद सर्व श्रमिकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. लॉकडाऊनसारख्या अडचणीच्या काळात प्रशासनाकडुन आत्मियतेने झालेल्या सहकार्यामुळे तसेच उपलब्ध करुन दिलेल्या सोयीसुविधांमुळे ह्या कामगारांना त्यांच्या मुळगावी जाणे शक्य झाले.

यावेळी आमदार सुनील शेळके, तहसीलदार मधुसुदन बर्गे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, मंडलाधिकारी संदीप बोरकर, तलाठी होरे भाऊसाहेब, सरपंच दत्तात्रय पडवळ, माजी उपसरपंच संदीप शेटे, दिनकर शेटे, बाळासाहेब शेटे, राजू पडवळ, हनुमंत कोयते, विजय शेटे, पांडुरंग शिंदे, अनिल बाबर, देविदास पडवळ, अविनाश पडवळ, शांताराम पडवळ, रामभाऊ पडवळ, जालिंदर शेटे, नवनाथ पडवळ, वैभव कार्ले, करण उडाफे, विजय शेटे, निवृत्ती  पडवळ शिवनाथ पडवळ, आदित्य येळवंडे  व इतर मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.