Talegaon dabhade : युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदी वैष्णवी झगडे यांची निवड

एमपीसी  न्यूज –   इंदोरी येथील पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या वैष्णवी अशोकराव झगडे यांची मावळ तालुका युवती काँग्रेसच्या  अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे   तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे यांनी त्यांना नियुक्तीचे तसे पत्र दिले आहे.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊली  दाभाडे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत  सातकर,वडगावचे नगराध्यक्ष  मयुर ढोरे,तळेगाव शहराध्यक्ष यादवेंद्र खळदे,तालुका कार्याध्यक्ष अॅड. खंडुजी तिकोणे, सरचिटणीस विजयराव काशीद पाटील, युवकचे तालुकाध्यक्ष विलास मालपोटे,उपाध्यक्ष सचिन काशीद ,मावळ तालुका ओबीसी सेलचे अध्यक्षसंभाजी लेंडघर ,तालुका लीगल सेलचे अध्यक्ष सुधीर भोंगाडे,मनोहर काशीद आदी उपस्थित होते.वैष्णवी झगडे या मावळ तालुका काँग्रेसचे सरचिटणीस विजयराव काशीद यांच्या कन्या असून उत्कृष्ट संघटक म्हणून त्या ओळखल्या जातात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.