Talegaon Dabhade: शाळेतून घरी जाताना बेपत्ता झालेला 10 वर्षीय विद्यार्थी सापडला निगडीमध्ये

एमपीसी न्यूज – शाळेतून घरी जाताना तळेगाव दाभाडे येथून संध्याकाळी बेपत्ता झालेला 10 वर्षीय विद्यार्थी रात्री निगडी परिसरात सापडला. निगडी पोलिसांनी त्याला तळेगाव पोलिसांच्या हवाली केले असून त्याला परत पालकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

शंकर जयराम बिराजदार (वय 10 वर्षे, रा. हरदेव अपार्टमेंट, लायन्स क्लब शेजारी, कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे) असे बेपत्ता झालेल्या व परत सापडलेल्या मुलाचे नाव आहे. हा मुलगा आदर्श विद्यामंदिर येथे इयत्ता पाचवीत शिकतो.

_MPC_DIR_MPU_II

शाळा सुटल्यावर घरी जात असताना तो बेपत्ता झाला होता. जिजामाता चौकाजवळ ज्ञानेश्वरनगरी येथे त्याला त्याच्या मित्राने पाहिले होते. त्यानंतर तो घरी परतला नाही अथवा त्याचा कोणताही ठावठिकाणा समजू शकलेला नाही. त्यामुळे तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. 

हा मुलगा निगडी परिसरात सापडला असून निगडी पोलिसांनी त्याला तळेगाव पोलीस ठाण्याच्या सुपूर्द केले आहे. मुलगा खूप घाबरलेला असल्याने पोलिसांनी त्याच्याकडे फारशी विचारपूस केली नाही. मुलगा धक्क्यातून सावरल्यानंतर त्याच्याकडून माहिती घेण्यात येईल. त्यानंतरच नेमके काय घडले आणि तो निगडीला कसा पोचला, हे स्पष्ट होऊ शकेल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.