Talegaon Dabhade: नियमांचे पालन न करणाऱ्या वडापाव सेंटर चालकास ५ हजारांचा दंड

Talegaon Dabhade: A fine of Rs 5,000 was imposed on the owner of Vadapav Center for not following the rules या व्यावसायिकाकडून फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणे, तोंडाला मास्क न लावणे, हातामध्ये मोजे न वापरणे, जास्त प्रमाणात गर्दी करणे आधी कारणामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

एमपीसी न्यूज- तळेगाव नगरपरिषदेकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दिलेल्या सूचनांचे पालन न करणाऱ्या तळेगाव स्टेशन येथील आनंद वडापाव सेंटरच्या मालकास पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला.

ही कारवाई नगरपरिषदेचे आस्थापना विभागाचे अधिकारी भास्कर वाघमारे, आरोग्य निरीक्षक मयुर मिसाळ, प्रवीण शिंदे पोलीस हवालदार किशोर गिरीगोसावी यांनी बुधवारी (दि 8) रोजी केली.

यामध्ये या व्यावसायिकाकडून फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणे, तोंडाला मास्क न लावणे, हातमोजे न वापरणे, जास्त प्रमाणात गर्दी करणे आदी कारणामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून रोज सकाळी 10 ते सायंकाळी सात वाजेपर्यंत एका व्हॅनमधून माइकद्वारे रस्त्यावर थुंकू नका, फिजिकल डिस्टन्सचे पालन करा, व्यापारी व ग्राहकांनी मास्कचा वापर करा, गरज असेल तरच घराबाहेर पडा, पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा अशा प्रकारच्या सूचना देत असतात.

या सूचनांचे जो पालन करणार नाही, त्यास जागेवरच दंड आकारला जाऊन त्यांच्याकडून रोख रक्कम जमा केली जाते. असे आवाहनही वारंवार करण्यात येते. तसेच या नियमाचे उल्लंघन करून दंडात्मक कारवाई करण्यास भाग पाडू नका, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.