Talegaon Dabhade : आंबी सर्कलजवळ आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

एमपीसी न्यूज – आंबी सर्कल जवळील पाण्याचे डबक्यात एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला आहे.

अंदाजे ३० ते ३५ वर्षे वय असून याबाबत तळेगांव एम.आय.डी. सी. पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली नसून याबाबत पोलीस तपास करीत आहेत. तरी याबाबत कोणास अधिक माहिती असल्यास तळेगांव एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मदेवाड ९९२२९४७५६२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.