Talegaon Dabhade : अल्पवयीन मुलाला दहा ते बारा जणांकडून मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी; आरोपी कैदेत

एमपीसी न्यूज : एका अल्पवयीन (Talegaon Dabhade) मुलाला 12 ते 13 जणांनी शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना तळेगाव दाभाडे शहरात घडली. याबाबत पिडीत मुलाच्या 38 वर्षीय आईने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अक्षय गायकवाड, प्रथमेश आगळे, यश गरुड उर्फ मॉन्स्टर, विष्णू धुमाळ, धीरज बनसोडे, प्रणव चांदणे, आर्यन गरुड (छोटा बांडी), रोशन लोखंडे (सर्व रा. तळेगाव दाभाडे) या आठ आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पैलवान उर्फ अतुल सोनवणे, विशाल वर्मा (सर्व रा. तळेगाव दाभाडे) तसेच दोन ते तीन इतर आरोपींविरोधात भादवि कलम 395, 363, 324, 143, 147, 148, 149, 504 506 सह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम कलम 4, 6, 8, म पो कलम 37 (1)(3)/ 135 शस्त्र अधिनियम कलम 4/25 सह क्रिमिनल अमेंडमेंट ऍक्ट कलम 7 अन्वये बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Transformer fire : दत्तवाडी येथे सकाळी ट्रान्सफॉर्मरला लागली आग

ही घटना ऑक्टोबर 2022 रोजी (Talegaon Dabhade) तळेगाव दाभाडे गावाच्या हद्दीतील भेगडे आळी समोरील मैदानामध्ये घडली. तिथे त्याला शिवीगाळ करून शस्त्राचा धाक दाखवून लाथा बुक्क्यांनी मारहाण केले व त्यांच्या लैंगिक अवयवांना दुखापत केली. त्याच्या खिशातील पॉकेट व त्यामधील 1,500 रुपये व आधार कार्ड चोरून नेले. तसेच, कोणाला सांगितले, तर जीवे ठार मारण्याची धमकी देऊन दहशत निर्माण केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.