Talegaon Dabhade : ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांची आख्यायिका विशद करणारे गीत प्रदर्शित

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहराचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांच्या (Talegaon Dabhade) उत्सवाचे औचित्य साधत डोळसनाथ महाराजांचा महिमा सांगणारे गीत प्रदर्शित करण्यात आले आहे. गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या या उत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रदर्शित करण्यात आलेल्या या गीतात मंदिराची उभारणी, जिर्णोद्धार यासह भैरवनाथाचे नाव डोळसनाथ म्हणून प्रचलित कसे झाले, याविषयी प्रचलित असलेली अख्यायिका विषद करण्यात आली आहे.

 

PMRDA: भूखंडाची ई  निविदा प्रक्रिया सुरु

श्री डोळसनाथ महाराजांवर गायलेले प्रदर्शित करण्यात आलेले पहिलेच गीत आहे. गायक चंदन कांबळे यांनी हे गीत गायले असून सहकलाकार गोरक्षनाथ जाधव यांनी साथ दिली आहे. गाण्याचे  गीतकार/संगीतकार असून संगीत दिग्दर्शक विनायक कुडाळकर आहेत. तर या गीताचे संगीत संयोजन अक्षय म्हाप्रळकर यांचे आहे.

 “गावाचा काळभैरवनाथ झाला डोळसनाथ” या गीताची निर्मिती पुणे महानगर नियोजन समिती सदस्य तथा तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे  नगरसेवक (Talegaon Dabhade) संतोष मारूती भेगडे यांनी केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.