Talegaon Dabhade : कलापिनी सांस्कृतिक केंद्रात शाडू मातीचे गणपती घडविण्याची कार्यशाळा संपन्न

एमपीसी न्यूज- गणेशाच्या (Talegaon Dabhade) आगमनानिमित्त येथील कलापिनी सांस्कृतिक केंद्रात पर्यावरण पूरक शाडू मातीचे गणपती घडविण्याची कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेचे हे पंधरावे वर्ष होते. विद्यार्थी पालक मिळून 35 जणांचा कार्यशाळेत सहभाग  होता.

डॉक्टर सोनवणे मॅडम, सुनील गोडसे, राज गुरव यांसारखे अनेक पालकही सहभागी झाले होते. पालकांचा आणि बालकांचा उत्साह आणि  गणेश मूर्ती तयार झाल्यानंतरचा मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद या उपक्रमाचे सार्थक झाले असा वाटणारा होता.

 

Maharashtra : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी झाले सोपे; ‘सीएमएमआरएफ’ ॲपवर अर्ज भरून मदत मिळविता येणार

अशोक नानीवडेकर, छाया हिंगमिरे व ज्योती देशपांडे यांनी कार्यशाळा घेतली. रामचंद्र रानडे, पांडुरंग देशमुख, किशोर कसाबी व श्रीपाद बुरसे यांनी या कार्यशाळेसाठी  विशेष परिश्रम घेऊन कार्यशाळा यशस्वी (Talegaon Dabhade)  केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.