Talegaon Dabhade : दुचाकी घसरून पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज – दुचाकी घसरून पडल्याने दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. जुन्या पुणे – मुंबई महामार्गवरील येथील सीआरपीएफ केंद्राजवळ गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारासहा अपघात झाला. दुचाकी नाल्यात कोसळली.

यशवंत निवृत्ती माने (वय ४१,रा. तळेगाव दाभाडे, ता.मावळ) असे अपघातात ठार झालेल्या  तरुणाचे नाव आहे.यशवंत माने हेकर्जत येथून तळेगावकडे परतत असताना त्यांच्यावर हा काळाने घाला घातला.

माने यांनी हेल्मेट घातले होते. या अपघातात हेल्मेट तुटले. डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच मृत्यू झाला. यशवंत माने हे येथील  कैकाडी समाज तरुण मंडळाचे क्रियाशील  कार्यकर्ते होते.येथील बनेश्वर स्मशानभूमीत माने यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले

तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. प्रवीण कानडे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक के. एस.गवारी करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like