Talegaon Dabhade Accident : टर्न मारताना अंदाज चुकल्याने ट्रक झाला पलटी

एमपीसी न्यूज : एक कंटेनर ट्रक सुधा (Talegaon Dabhade Accident) नदीवरील पुलाच्या सुरुवातीस सुदुंबरे गावामध्ये खाली पडला असून या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे, अशी माहिती तळेगाव वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक नागनाथ लकडे यांनी दिली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना लकडे म्हणाले, की हा अपघात सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडला आहे. तळेगावहून चाकणला जाणारा एक कंटेनर ट्रक सुदुंबरे येथील सुधा नदीवरील जुन्या पुलाजवळ पोहोचला होता. हा पूल अरुंद असल्याने याच्यावर एकेरी वाहतूक चालू आहे. पुलाच्या रस्त्यावर येत असताना टर्न मारताना चालकाचा अंदाज चुकला व ट्रक पलटी झाला.

Shapith Gandharva Part 6 : शापित गंधर्व – भाग सहावा – राजू श्रीवास्तव

या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी या अपघाताबाबत (Talegaon Dabhade Accident) पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. या रस्त्यावरून येणारे जाणारे लोक थांबून पलटी झालेल्या ट्रकला पाहत होते. तेथे बघ्यांची गर्दी सुद्धा होती. वाहतूक पोलिसांनी ती गर्दी हटविली व वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी रस्त्यावर वाहने थांबू देत नाहीत. या अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे. क्रेन बोलवून पलटी झालेल्या ट्रक सरळ करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.