Talegaon Dabhade : बाहेरून शहरात येणाऱ्या नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्यास कारवाई

Talegaon Dabhade: Action will be taken if the citizens coming to the city from outside do not follow the guidelines

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई, राज्यातील व देशातील विविध भागातून तळेगाव दाभाडे शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. 

पुणे, मुंबई व राज्याच्या इतर भागातून प्रवास करून तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यक्षेत्रामध्ये दाखल झालेल्या नागरिकांनी खालील दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन नगराध्यक्षा चित्रा जगनाडे व मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी केले आहे.

बाहेरून तळेगावमध्ये येणाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना –

 1.  मुंबई, पुणे व इतर भागातून दाखल झालेल्या नागरिकांनी स्वतः स्वताची माहिती दुरध्वनीव्दारे नगरपरिषदेस द्यावी.
 2. प्रवास करून आलेल्या नागरिकानी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या मार्फत प्राथमिक तपासणी करून घेणेत यावी.
 3. प्रवास करून आलेल्या नागरिकाने स्वतः प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे येथे मेडीकल तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
 4. संबंधित नागरिकांच्या वास्तव्य करीत असलेल्या ठिकाणी नगरपरिषदेच्या पथकामार्फत गृहभेट देऊन विलगीकरणा दरम्यान आरोग्य विषयक सर्व सुचना देण्यात येतील तसेच Home Quarantine चा शिक्का मारण्यात येईल.
 5. संबंधीत नागरिकाने १४ दिवस Home Quarantine राहणे आवश्यक आहे.
 6. ज्या व्यक्तीच्या हातावर Home Quarantine चा शिक्का असेल अशी व्यक्ती सार्वजनिक फिरताना आढल्यास अशा व्यक्तीला नगरपरिषदेमार्फत Institutional Quarantine करणेत येईल.
 7.  वैद्यकीय तपासणीदरम्यान कोरोना विषाणूची लक्षणे आढळल्यास संबंधीत प्रवासी नागरिकांना कोविड तपासणीकरीता रूग्णालयात पाठविणेत येईल.
 8.  तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांनी आपल्या बिल्डींग, सोसायटी, कॉलनी, जवळील परिसरात पुणे, मुंबई व राज्याच्या इतर भागातून प्रवास करून आलेले नागरिक नगरपरिषदेस माहिती न देता राहत असतील अश्या व्यक्तींची माहिती तात्काळ नगरपरिषदेत कळवावी.
 9. नगरपरिषदेने दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास संबंधित नागरिकांना नगरपरिषद तर्फे पोलीस कारवाई करून Institutional Quarantine करणेत येईल.
 10. नागरिकांनी माहिती देताना खालील दिलेल्या प्रभागानुसार पथक प्रमुखांना दूरध्वनी करून माहिती द्यावी, व्यक्तीशः कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकता नाही.
 11. खाली नमूद केलेल्या कोणत्याही मोबाईल नंबर वरती SMS व्दारे प्रवासी नागरिकांचे नाव, पत्ता, मोबाईल क्र. प्रवास माहिती व इतर आवश्यक माहिती द्यावी.

टोल फ्री क्रमांक 

18002332734

कोणतीही सूचना करणेसाठी वरील टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा

पथक प्रमुख व मोबाईल नंबर

पथक क्र.1 प्रभाग क्र.1 

विद्या अडसुळे, रेखा परदेशी, सरस्वती विद्या मंदिर 9881058569

पथक क्र.2 प्रभाग क्र. 2 

पी.एस.चौधरी, रामभाऊ परूळेकर विद्यानिकेतन विद्यानिकेतन 9860473187

पथक क्र.3 प्रभाग क्र.3 

संध्या कुलकर्णी, न.प.प्राथ.शाळा क्र.9657464272

पथक क्र.4 प्रभाग क्र.4

किसन केंगले, न.प.शाळा क्र.6 मोबाईल 9226270560

पथक क्र.5 प्रभाग क्र.5 

प्रिया गायकवाड,मेथॉडिस्ट गर्ल्स स्कूल 738769770

पथक क्र. 6 प्रभाग क्र.6

अनिता लादे, पैसाफंड शाळा 9552301543

पथक क्र.7 प्रभाग क्र.7 

प्रकाश मांडे, आदर्श शाळा 9960834559

पथक क्र.8 प्रभाग क्र.8 

प्रकाश जाधव, न.प.शाळा क्र.2 मोबाईल 9921267810

पथक क्र.9 प्रभाग क्र.9

शोभा कांबळे, न.प.शाळा क्र.5 मोबाईल 9960754809

10 पथक क्र.10 प्रभाग क्र.10

रा.भा. येणारे, अ‍ॅड. पु. वा. परांजपे विद्यालय 9423249475

 पथक क्र.11 प्रभाग क्र. 11

कैलास पारधी, समर्थ विद्यालय 9763881099

पथक क्र.12 प्रभाग क्र. 12

संजय चांदे, न.प.प्राथ.शाळा क्र.4 मोबाईल  9226891837

पथक क्र.13 प्रभाग क्र. 13

सुरेखा जाधव, न.प.प्राथ.शाळा.क्र. 1 मोबाईल 9766535062

अतिरिक्त संपर्क कर्मचा-यांचे नाव, मोबाईल नंबर

रवींद्र काळोखे, सभा कामकाज विभाग 9049938380

संभाजी भेगडे, करसंकलन विभाग 9960032784

प्रशांत गायकवाड, करसंकलन विभाग 8007804027

विलास वाघमारे, करसंकलन विभाग 9011324060

प्रवीण माने, करसंकलन विभाग 9923418398′

तुकाराम मोरमारे, करसंकलन विभाग 9545526317

प्रवीण शिंदे, पाणीपुरवठा विभाग 8605903309

तळेगाव दाभाडे नगरपरिषद अधिकारी यांचे नाव व संपर्क क्रमांक

दीपक झिंजाड, मुख्याधिकारी, त.दा.न.प. 9028852185

सुप्रिया शिंदे, उपमुख्याधिकारी, त.दा.न.प 9552999954

जयंत मदने, मिळकत व्यवस्थापक विभाग 9595791904

शरद पाटील, नगररचना विभाग 9822268012

मल्लिकार्जुन बनसोडे, बांधकाम विभाग 9423926559

विजय शहाणे,करसंकलन पर्यवेक्षक 9960626210

मयुर मिसाळ, स्वच्छता निरिक्षक, 9890821581

प्रमोद फुले, स्वच्छता निरिक्षक, 9011442160

विशाल मिंड, उद्यान विभाग प्रमुख 9960770827

अभिजीत गोंधळी, संगणक अभियंता 9762272048

अजित खरात, लेखापाल 9657970280

भास्कर वाघमारे, अस्थापना विभाग 9767304693

वरील कोणत्याही मोबाईल नंबरवर SMS व्दारे प्रवास करून आलेल्या व्यक्तींची माहिती कळवावी. नगरपरिषद प्रशासन आपल्या सेवेस तत्पर आहे.

नागरिकांना आवाहन 

मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद येथून विनापरवानगी (ई -पास शिवाय) तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यक्षेत्रात दाखल झालेल्या नागरिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात पाठविण्यात येईल. तरी ई-पास शिवाय कोणीही तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यक्षेत्रात दाखल होऊ नये आणि इतर कोणी ई -पास शिवाय अवैधरित्या दाखल होत असल्याचे आपणास समजल्यास त्यांना ई -पास घेऊनच येणेस सूचित करावे. अन्यथा त्यांच्यावर फौजदारी गुन्हे  दाखल करण्यात येईल आणि त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात पाठविणत्यात येईल. परवानगी घेऊन आल्यानंतरही 14 दिवस होम क्वारंटाईन राहणे बंधनकारक आहे.

एखाद्या कुटुंबाने उपरोक्त ठिकाणावरून  आलेल्या व्यक्तींची माहिती लपवल्याचे निदर्शनास आल्यास त्या संपूर्ण कुटुंबाला संस्थात्मक विलगीकरण कक्षात पाठविले जाईल आणि फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. वरील सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी, असे नगर परिषदेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.