Talegaon Dabhade: प्रशासनाने लोकप्रतिनिधींना कोरोनासंदर्भातील निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे – भाजप

Talegaon Dabhade: Administration should involve public representatives in decision making process regarding corona - BJP

तळेगाव दाभाडे – येथील तळेगाव शहर भारतीय जनता पक्षाकडून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमध्ये कोरोना संसर्ग उपाययोजना बाबत होणाऱ्या नियोजनामध्ये नगरपरिषद प्रशासन मनमानी कारभार करत असून प्रशासनाने लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यावे. अशा मागणीचे निवेदन मावळ तालुका आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना आज गुरूवार (दि 14) देण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी तळेगाव शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रवींद्र माने, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, कार्याध्यक्ष महेंद्र पळसे, गटनेते अमोल शेटे, नगरसेवक अरुण भेगडे पाटील, गणेशआप्पा भेगडे, सचिन टकले, सतीश राऊत, रवी साबळे, प्रदीप गटे, रवींद्र भोसले आदी उपस्थित होते.

या निवेदनामध्ये परराज्यात व परजिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी संदर्भातील तसेच स्थलांतरितांसाठी काय व्यवस्था केली जात आहे, याची माहिती संबधितांना देण्यात यावी. आणि नगरपरिषद कार्यक्षेत्रात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेण्यात येणारे निर्णयाबाबत प्रशासनाने नगराध्यक्षा, गटनेते व सर्वपक्षीय नगरसेवक-नगरसेविका यांच्याशी योग्य समन्वय ठेवावा, अशी मागणीही  निवेदनात केली आहे.

प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातील विसंवादामुळे उपाययोजना करण्या संदर्भातील वेळोवेळी बदलले जाणारे विविध निर्णय यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

या बाबत तहसीलदार बर्गे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधितांना विश्वासात घेण्यात येईल असे आश्वासन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.