Talegaon Dabhade : ॲड् पु. वा. परांजपे विद्यामंदिर शाळेचा स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज : नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या (Talegaon Dabhade) ॲड. पु. वा.परांजपे विद्या मंदिर शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षातील वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि. 14) उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध उपक्रमांचे प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमात शिक्षण महर्षी आमदार कृष्णराव भेगडे यांनी उपस्थित राहून सर्वांना शुभाशीर्वाद दिले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक ज्ञानेश्वर तथा माऊली दाभाडे, पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी अध्यक्ष व संचालक बबनराव भेगडे, मावळ तालुक्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून दिगंबर ढोकले, नू.म. वि. प्र. मंडळाचे उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, प्राचार्य डॉ.संभाजी मलघे, दैनिक सकाळचे माजी उपसंपादक व प्रा सत्यजित खांडगे, इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे तसेच संस्थेचे ज्येष्ठ संचालक दामोदर शिंदे, यादवेंद्र खळदे, सोनबा गोपाळे,चंद्रकांत शेटे, महेशभाई शहा, विनायक अभ्यंकर, शंकर नारखेडे असे सर्व संस्था पदाधिकारी उपस्थित होते. तसेच शालेय समितीचे सदस्य अशोक काळोखे, आनंद भेगडे, प्रशांत भागवत, पत्रकार प्रभाकर तुमकर, आजी-माजी मुख्याध्यापक शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्नेहसंमेलनातील कार्यक्रमाचे ध्वजारोहण पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या हस्ते संपन्न झाले. संस्थेचे पहिले अध्यक्ष लोकमान्य टिळक तसेच राष्ट्रीय शिक्षणाचे अध्वर्यू संस्थेचे संस्थापक चिटणीस गुरूवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांच्या प्रतिमेचे अनावरण पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक, माजी अध्यक्ष माऊली दाभाडे यांच्या हस्ते संपन्न झाले. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलागुणांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Vadgaon Maval : किल्ले तिकोना गड संवर्धन आराखडा पुरातत्व खात्यासमोर सादर

यात चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन नू.म.वि.प्र.मंडळाचे (Talegaon Dabhade) उपाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या हस्ते झाले. रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे प्रा. दिगंबर ढोकले यांच्या हस्ते तसेच हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे दैनिक सकाळचे माजी उपसंपादक प्रा सत्यजित खांडगे यांच्या हस्ते तर विज्ञान व गणित प्रदर्शनाचे उद्घाटन इतिहास संशोधक डॉ.प्रमोद बोराडे यांच्या हस्ते संपन्न झाले.

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘नंदादीप’ हस्तलिखिताचे प्रकाशन नू.म.वि.प्र.मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांच्या हस्ते झाले. शाळेचे अहवाल वाचन पीपीटीच्या सहाय्याने सर्वांपुढे शिक्षक प्रतिनिधी वैशाली कोयते यांच्या प्रयत्नातून संगणक तज्ञ प्राजक्ता खरमाटे तसेच माजी विद्यार्थीनी ऋतुजा धनाड यांच्या सहकार्यातून यशस्वी झाले.

प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवहारिक ज्ञानदेखील गरजेचे आहे याविषयी सांगितले. इयत्ता दहावीच्या पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थी व शिक्षकांनी ठेवलेल्या ठेवीतून बक्षिसे दिले.शालेय पातळीवर झालेल्या स्पर्धेतून पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक केले. पारितोषिक वितरणाचे काम संगीता खराडे व दिप्ती बारमुख यांनी केले.

सर्व विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला. याप्रसंगी विविध कला गुणदर्शनाचे सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. विद्यार्थ्यांचे कलागुण पाहण्यासाठी पालक वर्ग, तसेच माजी विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. दोन वर्षानंतर झालेल्या या स्नेहसंमेलनात सर्वांनी खूप उत्साहाने व आनंदाने सहभाग घेतलेला जाणवला. कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षक पांडुरंग कापरे सरांनी मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संमेलन प्रमुख अनिता नागपुरे व जेष्ठ अध्यापिका रजनी बधाले यांनी केले. या सर्व कार्यक्रमाला मार्गदर्शन शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार शेलार मुख्याध्यापक पांडुरंग पोटे व पर्यवेक्षक कापरे, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद या सर्वांनी मोलाचे सहकार्य (Talegaon Dabhade) केल्यामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.