Talegaon Dabhade: मावळ तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी सप्ताह साजरा

Talegaon Dabhade: Agriculture week celebrated on farmers land in Maval taluka यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने सोयाबीन पेरणी केलेल्या क्षेत्रावर जांबवडे येथील प्रगतशील शेतकरी सरपंच सारिका अनिल घोजगे यांच्या शेतावर कार्यक्रम घेण्यात आला.

एमपीसी न्यूज- मावळ तालुका कृषी विभागाच्या वतीने दि.1 जुलै ते 7 जुलै दरम्यान कृषी संजीवनी सप्ताह साजरा केला जात आहे. या कृषी संजीवनी सप्ताहाअंतर्गत तालुक्यात विविध ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत. यानिमित्ताने जांबवडे येथील शेतकऱ्यांच्या बांधावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

खरीप हंगामातील विविध योजना, पीक लागवड, पीक उत्पादनावर परिणाम न करता उत्पादन खर्च कमी करणे, प्रधानमंत्री पीक विमा योजना, हवामान आधारित फळपीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनांबाबत जनजागृती करणे व प्रसिध्दी देणे, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, केंद्र व राज्य शासनाच्या कृषी व कृषी संलग्न विभागाच्या शेतकऱ्यांसाठीच्या योजनांबाबत सहाय्यक कृषी अधिकारी स्वाती घनवट यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

कृषी संजीवनी सप्ताह शेतकऱ्यांच्या बांधावर साजरा करण्यात आला. यांत्रिकीकरणाच्या (BBF) सहाय्याने सोयाबीन पेरणी केलेल्या क्षेत्रावर जांबवडे येथील प्रगतशील शेतकरी सरपंच सारिका अनिल घोजगे यांच्या शेतावर कार्यक्रम घेण्यात आला.

मावळचे तालुका कृषी अधिकारी उत्तम भांड यांनी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी आधुनिक पद्धतीने पीक लागवड करावी, असे आवाहन केले.

यावेळी कृषी सहाय्यक स्वाती घनवट, प्रियंका पाटील, राहुल घोगरे (आत्मा)आणि ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.

पांडुरंग घोजगे, संतोष नाटक, काशिनाथ भांगरे, ग्रामपंचायत सदस्य विकास भांगरे, योगेश नाटक, संभाजी राऊत, मदन भांगरे, दत्तात्रय नाटक, अनिल घोजगे, शकुंतला राऊत, संगीता राऊत, कांताबाई भांगरे, दर्शना वाळुंज, कैलास नाटक, लक्ष्मण घोजगे, रोहिदास वाळुंज, नामदेव भोसले, दत्तात्रय घोजगे, मदन भांगरे, भास्कर भांगरे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.