Talegaon Dabhade: तहसीलदार परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अजिंक्य सावंत यांचा ‘नूतन महाराष्ट्र’तर्फे सत्कार

Talegaon Dabhade: Ajinkya Sawant felicitated by 'Nutan Maharashtra' for passing Tehsildar Examination

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य नागरी सेवा तथा एमपीएससी परीक्षेतून तहसीलदार झालेले अजिंक्य सावंत यांचा सत्कार तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये नुकताच पार पडला. अजिंक्य सावंत यांनी नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ई अँड टीसी विभागातून बीईची पदवी प्राप्त करून स्पर्धा परीक्षेची तयारी केली होती. 

संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, उपाध्यक्ष बाळा भेगडे, सचिव संतोष खांडगे, खजिनदार सुरेशभाई शहा,  संस्थेचे विश्वस्त गणेश खांडगे, महेशभाई शहा, दामोदर शिंदे, यादवेंद्र खळदे, सोनबा गोपाळे, प्राचार्य डॉ. ललितकुमार वधवा, नूतन संस्थेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक आदी याप्रसंगी उपस्थित होते.

शासकीय सेवेमार्फत जनतेच्या कल्याणाच्या योजना राबवून प्रामाणिक कर्तव्यदक्ष अधिकारी बनून संस्थेचे आणि मावळचे नाव मोठे करीन, अशी भावना सत्कार प्रसंगी अजिंक्य सावंत यांनी व्यक्त केली.

‘अजिंक्य हा ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे. अतिशय कष्ट करून समाजामध्ये हे यश संपादन केले असून मावळ तालुक्याचे नाव उज्वल केले आहे’, असे उद्गार या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे यांनी सावंत यांना शुभेच्छा देताना व्यक्त केले.

संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी ‘अजिंक्य हा आमच्या संस्थेचा विद्यार्थी आहे याचा आम्हाला अभिमान आहे’, असे सत्कार प्रसंगी बोलून त्याला पुढील  वाटचालीस शुभेच्छा  व्यक्त केल्या. सर्व उपस्थित मान्यवरांनी या यशाबद्दल अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.