Talegaon Dabhade : अरेच्चा! चक्क माजी आमदारांचे नाव मतदार यादीतून वगळले

निवडणूक प्रशासनाचा सावळा गोंधळ

एमपीसी न्यूज – निवडणूक विभागाकडून तयार केलेल्या मतदार याद्यांमध्ये अनेकांची ( Talegaon Dabhade) नावे वगळण्यात आली आहेत. तर काहींच्या नावापुढे मयत असे लिहिण्यात आले आहे. नवीन मतदारांचे मतदान केंद्र घरापासून लांब अंतरावर आले आहे, असे एक ना अनेक प्रकार नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या मतदानावेळी उघड झाले. तळेगाव मध्ये चक्क माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचेच नाव वगळण्यात आले. आजवर आलेल्या मतदार याद्यांमध्ये नाव असताना देखील अचानक वगळण्यात आल्याने माजी आमदारांना मतदान करता आले नाही तसेच काहींना मतदान न करता परतावे लागले. अनेकांच्या बाबतीत असे प्रकार घडले.

 

मावळ लोकसभा मतदारसंघाचे मतदान सोमवारी (दि.13) पार पडले. मागील निवडणुकीपेक्षा मतदानाची टक्केवारी घटल्याचे पहायला मिळाले. नागरिकांमधील अनास्था, पावसाचे वातावरण, इतर शहरांमध्ये वास्तव्य यांसह मतदार याद्यांमधून मतदारांची नावे वगळणे, हयात असलेल्या मतदारांच्या नावापुढे मयत लागणे, मतदान केंद्रांवर मोबाईल नेण्यास असलेली बंदी अशा अनेक कारणांमुळे यावर्षी मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचे पहायला मिळाले.

 

अनेक मान्यवरांची मतदार यादीतील नावे गाळून त्यांना मतदान करण्यापासून वंचित राहावे लागले; तर अनेकांची नावे त्यांच्या राहत्या घरापासून दूरवर असलेल्या केंद्रावर टाकून निवडणूक प्रशासनाने सावळा गोंधळ निर्माण केला. त्यामुळे असे अनेक प्रकार घडल्याने अनेकांचे मतदान झाले नाहीच; मात्र अनेकांवर संताप व्यक्त करण्याची वेळ आली.

 

Pune : महिलेची छायाचित्रे प्रसारीत करण्याची धमकी देत उकळली खंडणी,भोंदू विरोधात गुन्हा दाखल 

 

मतदार यादीत नाव नाही, चुकीची नावे अशा अनेक चुकांमुळे माजी आमदार,मावळ भूषण कृष्णराव भेगडे,साप्ताहिक अंबरचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार,गायक सुरेश साखवळकर,तळेगाव दाभाडे शिक्षण मंडळाचे माजी सभापती डॉ प्रदीप लिमये, त्यांच्या पत्नी,मुलगा यांच्यासह  विविध क्षेत्रात काम करणाऱ्यां मतदारांना मतदान न करता घरी परतावे लागले. त्यामुळे निवडणूक प्रशासनाच्या अजब कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

सन 2019  च्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदार यादीत नावे होती. परंतु सन 2024 च्या निवडणूकीतील यादीतून ही नावे गायब कशी झाली. याबाबत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. ही नांवे वारंवार गायब का होतात? त्याच्या पाठीमागे काय गौडबंगाल आहे? की निवडणूक प्रशासनाचा गलथानपणा आहे. याची चौकशी व्हावी अशी मागणी शहरांतील विचारवंतांनी केली आहे.

 

असे चुकीचे प्रकार निवडणूक प्रशासनाकडून का करण्यात आले. की, कोणाच्या सांगण्यावरून? की अनावधानाने झाले. अधिकारी वर्गाकडून अशा चुका झाल्या यामागे कोण आहे? यापूर्वी झालेल्या विविध निवडणूकांमध्ये वापरलेल्या मतदार यादीतून नावे कमी झालीच कशी? हा मोठा प्रश्न आहे.शिवाय जे नवीन मतदार आहेत त्यांची नावे दुरवरच्या केंद्रावर,काहींचे नाव,आडनाव चुकलेले.तसेच मतदान केंद्रावर मोबाईल फोनला प्रतिबंध केल्यामुळे अनेकांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवली. अशा अनेक अडचणींमुळे या सगळ्यांचा (Talegaon Dabhade) परिणाम मतदानाची टक्केवारी कमी होण्यावर झाला.

निवडणूक प्रशासनाकडून योग्य पद्धतीने व काळजीपूर्वक मतदार यादया प्रसिद्ध करण्यात आल्या पाहिजेत. पुढे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीत अशा चुका होता कामा नये.
     सुरेश साखवळकर
संपादक सा.अंबर, ज्येष्ठ पत्रकार..
……………
Talegaon Dabhade) 
सन 1957 साली प्रथम मतदान केले.तेव्हापासून मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.
यंदाच्या सार्वत्रिक निवडणूकीत आधार लिंक होताना दुसरेच नाव येत होते.त्यामुळे प्रथमच मतदान करू शकलो नाही.
माजी आमदार कृष्णराव भेगडे
………………………
याबाबत मावळ विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत सुरेंद्र नवले आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम देशमुख (तहसीलदार) यांना दूरध्वनीवरून वारंवार संपर्क साधला असता, संपर्क होऊ (शकला नाही.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.