Talegaon Dabhade : स्वीकृत नगरसेवकपदाचे राजकारण आडनावांभोवतीच !

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यांच्या निवडी बिनविरोध होण्याचा सोपस्कार पार पडला असून त्यामध्ये प्रत्येक पक्षाने आपापल्या परीने क्रियाशील कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केलेला दिसत असला तरी देखील आगामी विधानसभेच्या निवडणुकीची गणिते डोक्यात ठेवूनच नगरपालिकेत आडनावाभोवतीच राजकारण फिरल्याचे पहायला मिळत आहे.

तसं पाहिलं तर तळेगाव नगरपरिषदेच्या सभागृहात भेगडे परिवारातील सदस्यांची संख्या आठ होती. अर्थात ते सदस्य वेगवेगळ्या पक्षांचे असले तरी, यावेळी एकने कमी होऊन देखील सदस्य संख्या सात राहिली आहे. विशेषतः भेगडे आडनावाचेच या ठिकाणी प्राबल्य दिसून येते.

यावेळी दाभाडे परिवारातील स्वीकृत सदस्यांचे निमित्ताने एकने वाढ होऊन, तीन संख्या झाली आहे.

काकडे आणि आवारे या दोघांचे स्वीकृत सदस्य म्हणून एक- एकने वाढ होऊन सदस्य संख्या दोन- दोन झालेली दिसत आहे. शेळके आडनावाचे दोन सदस्य आहेत. स्थानिकांपैकी खळदे, काळोखे, खांडगे, शेटे एक एका सदस्य संख्येवर आहेत.

तसे पाहिले तर सभागृहात दिवंगत जयवंतराव भेगडे यांच्या परिवारातील चार सदस्य नगरसेवक आहेत. एक मुलगा, एक सून, एक नातू, एक नात. त्यांचीच बरोबरी दिवंगत महादेवराव काकडे यांच्या परिवारातील एक मुलगी व तीन नातू एकाच सभागृहात आहेत.

यावेळीही आरपीआयच्या कार्यकर्त्याला किंवा महिला कार्यकर्त्यांना संधी दिली गेली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.