Talegaon Dabhade: ‘मिशन बिगिन अगेन’ ! सर्व प्रकारची दुकानं, वर्कशॉप आजपासून सुरु

ऑनलाइन खरेदी विक्री सेवा चालू राहतील, ऑनलाइन/ डिस्टन्स लर्निग चालू राहिल, सर्व खासगी आस्थापना 30 टक्के स्टाफ अथवा 30 कर्मचारी यांच्यासोबत सुरू राहतील

एमपीसी न्यूज- मिशन बिगिनच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाच्या दि. 31 ऑगस्ट 2020 च्या नवीन आदेशानुसार दि. 2 सप्टेंबरपासून तळेगावातील आस्थापना कार्यरत राहतील, अशी माहिती शासनाच्या आदेशान्वये उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी दिली.

यामध्ये सर्व प्रकारची दुकाने, किराणा मार्केट, बाजारपेठेतील दुकाने, गॅरेज वर्कशॉप सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत उघडी राहतील, तसेच नाभिक दुकाने, स्पा, ब्युटी पार्लर हे ग्राहकांची पूर्व नियोजित वेळ ठरवून सकाळी 9 ते 5 यावेळेत सूरु ठेवता येतील. ऑनलाइन खरेदी विक्री सेवा चालू राहतील, ऑनलाइन/ डिस्टन्स लर्निग चालू राहिल, सर्व खासगी आस्थापना 30 टक्के स्टाफ अथवा 30 कर्मचारी यांच्यासोबत सुरू राहतील, लग्न समारंभ 50 माणसे, मोकळ्या जागी तसेच हिरवळीवर घेण्यास परवानगी आहे. तसेच अंत्यविधी कार्यक्रम 20 लोकांच्या उपस्थितमध्ये असावा.

तसेच शाळा, कॉलेज इतर शैक्षणिक संस्था, शिकवणी 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहतील. मोकळ्या मैदानात शारीरिक व्यायामास परवानगी आहे. तसेच Outdoor gymnastics, tennis, outdoor badminton हे व्यायाम प्रकार सर्व प्रतिबंधात्मक काळजी घेऊन सुरू करता येतील. परंतु स्वीमिंग पूल सुरू करण्यास परवानगी नाकारण्यात आलेली आहे. वर्तमानपत्रे छपाई व वितरण सुरू करण्यात येत आहे, हॉटेल व लॉज चालू करण्यास परवानगी आहे. सिनेमा हॉल सुरू करण्यासस परवानगी नाही.

या शिवाय प्रवास करताना चालकासह टॅक्सीत चार, रिक्षामध्ये तीन, खासगी चारचाकी वाहनातून चौघांना, तसेच दोन चाकीवर दोन जणांना प्रवास करता येईल. लोकल, मेट्रो सेवा बंद. 65 वर्षावरील व्यक्ती, 10 वर्षाखालील बालके, तसेच आजारी व्यक्ती यांना अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर फिरवण्यास मनाई आहे.

या सर्व बाबी शासनाने ठरवून दिलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबाजावणी करून सुरू करणेस परवानगी राहिल, अशी माहिती शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.