Talegaon Dabhade : भोयरे येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा साहित्य वाटप

एमपीसी न्यूज – न्यु इग्लिश स्कूल भोयरे येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना सरपंच दत्तात्रय पडवळ यांच्या वतीने परीक्षा साहित्य वाटप करण्यात आले परीक्षेच्या दरम्यान पेपर लिहण्यासाठी लागणारे पँड कंपास पेटी पेन आदी वस्तुचे वाटप करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

अनेक अडथळे मात करून बिकट परिस्थितुन मार्ग काढत दहावीपर्यंत शिकत आलेल्या विद्यार्थ्यांना शेवटच्या क्षणी आनंदात परीक्षा देता यावी, या हेतूने सहित्य वाटप केले असल्याची माहिती देत विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी सरपंच दत्तात्रय पडवळ यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी भोयरे सरपंच बळीराम भोईरकर उपसरपंच मंगल अडिवळे, पो.पाटील, मंगेश आडिवळे, भास्कर लखिमले, सोपान अडिवळे, प्राचार्य भोसले, शिक्षक जगताप आदी उपस्थितीत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.