मंगळवार, जानेवारी 31, 2023

Talegaon Dabhade : आरोग्याच्या बाबतीत सदैव जागृत रहा – प्राचार्य डॉ. संभाजी मलघे

इंद्रायणी महाविद्यालयात एड्स जन-जागृती कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज – तरूणांनी आपल्या (Talegaon Dabhade) आरोग्याची काळजी घ्यावी. आयुष्य मौल्यवान आहे. या वयात कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घेणे ही खूप मोठी जबाबदारी आहे. आरोग्याच्या बाबतीत सदैव जागृत रहा, असा सल्ला इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी दिला. महाविद्यालयात विज्ञान विभागाच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त एड्स जन-जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. विद्यार्थ्यांना या रोगाबद्दल अधिक शास्त्रशुद्ध माहिती मिळावी म्हणून प्रा. राखी चौडणकर यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान संपन्न झाले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे,विज्ञान विभाग प्रमुख प्रा. रोहित नागलगाव,प्रा. राखी चौडनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. मलघे म्हणाले की, आपल्याला कोरोना महामारीने आरोग्याच्या बाबतीत खूप जागृत केले आहे. परंतु, आरोग्याच्या बाबतीत आपण सदैव जागृत असायला हवे. त्यामुळे एड्स सारखे आजार पसरणार नाहीत. अनैतिक, चुकीच्या अशा अनेक कारणांनी या रोगाचा प्रादुर्भाव होतो.
तरूणांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. आयुष्य मौल्यवान आहे. या वयात कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घेणे ही खूप मोठी जबाबदारी असल्याचे प्राचार्य म्हणाले. खेळ, योग-प्राणायाम याकडे जास्त लक्ष देत प्रत्येकाने उत्तम आरोग्य संपादन करावे असा सल्ला यावेळी मलघे यांनी दिला.

Vadgaon maval

विद्यार्थ्यांना या रोगाबद्दल अधिक शास्त्रशुद्ध माहिती प्रा. राखी चौडनकर यांनी पॉवर पॉइंट प्रेसेंटशन च्या माध्यमातून आणि काही youtube व्हिडिओच्या माध्यमातून दिली. आपल्या प्रभावी आणि अभ्यासपूर्ण माहीतीने त्यांनी उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांना योग्य मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी एड्स रोगाच्या चिन्हांकित फिती लावून जागृती कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला.

PCMC: शालेय पोषण आहारात आळ्या; स्वयंरोजगार संस्थेचे काम काढले, काळ्या यादीतही टाकले

कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ साहित्यिक, माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले यांना श्रद्धांजली (Talegaon Dabhade) अर्पण करून झाली. यावेळी महाविद्यालयातील विविध विषयांचे विभागप्रमुख,प्राध्यापक आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिंपल सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. विद्या पाईकराव यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी अयोजन विज्ञान विभागातील प्रयोगशाळा परिचारक अनिकेत भोकरे, धनश्री कारले यांनी केले.

Latest news
Related news