Talegaon Dabhade : पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांची सरस्वती विद्या मंदिर शाळेला भेट

0

एमपीसी न्यूज- लहान मुलांनी गाड्या चालवू नये, मोबाइलच्या आहारी जाऊ नका, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपले आरोग्य सांभाळा असा सल्ला तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिला. महिला दक्षता समिती अंतर्गत पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी बुधवारी (दि. 12) सरस्वती विद्या मंदिर शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी संस्था अध्यक्ष रेश झेंड, सदस्य विश्वास देशपांडे, डॉ ज्योती चोळकर, संगीता शिंदे, अंजली जोगळेकर, वाबळे सर उपस्थित होते.

वाघमोडे म्हणाले, ” मुलांनी मोबाईलच्या आहारी नये. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपले आरोग्य सांभाळा, व्यसनाच्या आहारी जाऊ नका. इंटरनेट द्वारे होणाऱ्या आर्थिक फसवणुकीबाबत सावध राहा ” असे सांगत त्यांनी पोलिसांच्या बडी कॉपबद्दल माहिती सांगितली. काही अडचण असेल तर पोलिसांना फोन करा 10 मिनिटात मदत मिळेल याचे आश्वासन त्यांनी मुलांना दिले.

प्रास्ताविक मुख्याध्यापिका रेखा परदेशी यांनी केले. सूत्रसंचालन सुनीता कुलकर्णी यांनी केले.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like