Talegaon Dabhade : सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या मावळ तालुका अध्यक्षपदी अमीन शेख यांची निवड

एमपीसी न्यूज- सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या मावळ तालुका अध्यक्षपदी अमीन फकीर मोहम्मद शेख यांची निवड करण्यात आली आहे. सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष आशिष पालकर यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.

समाजातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न व त्यांच्या अडचणी सोडविण्याची आपली हातोटी व कौशल्य पाहून आपली मावळ तालुका अध्यक्षपदी निवड केल्याचे पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. संघटनेच्या ध्येयधोरणानुसार समाजातील तळागाळापर्यंत पोहोचून समाजावर होणारा अन्याय व अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम करावे. संघटना वाढीसाठी प्रयत्न करावा अशी अपेक्षा पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.