Talegaon Dabhade: अंजना गडसिंग यांचे निधन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील  शेतकरी कुटुंबातील व वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मार्गदर्शिका  श्रीमती अंजना शत्रुघ्न गडसिंग (वय 97) यांचे मंगळवारी (14 एप्रिल) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, विवाहित मुलगी, पुतणे, सुना, नातवंडे,  पतवंडे असा मोठा परिवार आहे.

_MPC_DIR_MPU_II

अंजना गडसिंग या त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. शिक्षण क्षेत्राविषयी त्यांना नितांत आवड होती. उद्योजक नारायण गडसिंग, दत्तात्रय गडसिंग आणि आंबी येथील हेरिटेज शैक्षणिक संकुलचे संस्थापक सचिव व सेवानिवृत्त उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) हरिश्चंद्र गडसिंग यांच्या त्या मातोश्री होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.