Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. या स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार पाहायला मिळाला.

स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दिवशी इ. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी कलागुण सादर केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार कृष्णराव भेगडे , माजी परिवहन अधिकारी हरिश्चंद्र गडसिंग, आयकर आयुक्त सुनील काशीद, संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे, अध्यक्ष संदीप काकडे, शाळेचे अध्यक्ष डॉ. दिलीप भोगे, संस्थेच्या खजिनदार गौरी काकडे, पत्रकार सुनील वाळुंज, राजश्री म्हस्के, भगवान बोत्रे हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनेने करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला. या वर्षीचा गुणवंत विद्यार्थी म्हणून इ. दहावीचा कु.आदित्य कैलास पवार याला पारितोषक मिळाले व मयुरी दिलीप पाटील हिला गुणवंत विद्यार्थिनीचा पुरस्कार मिळाला.

यानंतर कार्यक्रमात अनेकविध प्रकारची नृत्ये सादर करण्यात आली. वेगवेगळ्या गाण्यांवर मुलांनी केलेले सादरीकरण पाहून प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सपना पॅट्रिक व इ. 9 वी चे विद्यार्थी पार्थ कुंभार, सेजल लिमन, हेमंत निंबळे, सिद्धी राहतेकर यांनी केले.

दुसऱ्या दिवशी नर्सरी ते सिनियर के.जी.या चिमुकल्यांचे स्नेहसंमेलन आयोजित केले होते. या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तळेगाव एम्.आय. डी. सी.रोटरी क्लबचे अध्यक्ष शंकर हादीमनी व माजी अध्यक्ष अजय पाटील उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर यांनी प्रस्तावना केली

अध्यक्षीय भाषणात शंकर हादीमनी यांनी आपल्या भाषणात पालकांनी आपल्या पाल्याला शिक्षणाबरोबर इतर कलागुणांना वाव द्यावा.त्यांच्या विविध कला जोपासाव्यात व त्यांच्यावर चांगले संस्कार करावेत असे मत व्यक्त केले.

यानंतर चिमुकल्यांचे विविध कलाविष्कार व नृत्ये सादर करण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मीना होले व इ. चौथीचे विद्यार्थी श्रेया झावरे व अथर्व राहतेकर यांनी केले. अशा प्रकारे दोन दिवस चाललेला हा समारंभ अतिशय उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.