Talegaon Dabhade : श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे रविवारी आयोजन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (Talegaon Dabhade) आयोजित करण्यात आली आहे. ही सभा रविवारी (दि. 17) सायंकाळी सहा वाजता इशा हॉटेल येथे होणार आहे. या सर्वसाधारण सभेमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक संस्थेचे अध्यक्ष राहुल पारगे व पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य आणि नगरसेवक संतोष भेगडे यांनी दिली.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस तसेच विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी हे प्रमुख वक्ते असतील. संस्थेचे संस्थापक, सहकारभूषण बबनराव भेगडे यांच्यासह मावळचे आमदार सुनील शेळके, पुणे पीपल्स बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष मोहिते,राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश खांडगे, तळेगाव शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश काकडे, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड रवींद्रनाथ दाभाडे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार (Talegaon Dabhade) आहेत.
मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बबनराव भोंगाडे यांना जीवनगौरव पुरस्कार, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांना श्री डोळसनाथ भूषण पुरस्कार, शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल माजी उपनगराध्यक्ष यादवेंद्र खळदे, उद्योग क्षेत्रातील कार्याबद्दल रणजित काकडे यांना युवा उद्योजक पुरस्कार, सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल दिलीपभाई शहा यांना पुरस्कार, साहित्यिक, सांप्रदायिक क्षेत्रातील कार्याबद्दल अंबरचे संपादक सुरेश साखवळकर आदीं पुरस्कारार्थींना उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने नागरिक व मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती देखील कार्यक्रमाचे निमंत्रक संस्थेचे अध्यक्ष राहुल पारगे व संस्थेचे आधारस्तंभ तसेच माजी नगरसेवक संतोष भेगडे यांनी केली (Talegaon Dabhade) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.