Talegaon Dabhade : सह्याद्री इंग्लिश स्कुलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज- व्यक्तित्व, चारित्र्य आणि राष्ट्रीयत्व निर्माण होण्यासाठी निरोगी शरीर हवे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित व्यायाम, योग्य आहार घ्यावा. खेळाच्या सरावात सातत्य राखावे, शरीर तंदुरुस्त ठेवावे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग विजेते नितीन म्हाळसकर यांनी केले. तळेगाव दाभाडे येथील सह्याद्री इंग्लिश स्कुलचा वार्षिक क्रीडा महोत्सव आणि पारितोषिक वितरण समारंभाचे उदघाटन करताना म्हाळसकर बोलत होते.

यावेळी संस्थेचे सचिव दत्तात्रय नाटक, शालेय समितीचे अध्यक्ष रवींद्र धारणे, संचालक राहुल गोळे, स्वप्नील आंबेकर, मुख्याध्यापिका संध्या लाळे, नूतन पवार आदी उपस्थित होते.

यावेळी उंच उडी, लांब उडी,कुस्ती, गोळाफेक,धावणे या वैयक्तिक प्रकारातील स्पर्धाबरोबरच सांघिक खेळांच्याही स्पर्धा पार पडल्या. विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सानिका मुकुंद मु-हे आणि आशिष राजू कसोधन यांची निवड करण्यात आली. सूत्रसंचालन ऋतुजा भेगडे आणि कोमल मोहिते यांनी केले. संयोजन क्रीडा शिक्षक रवी थोरात यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.