Talegaon Dabhade: नीळकंठनगरमधील विठ्ठल मंदिरात काकड आरती सोहळा

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील नीळकंठनगरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सध्या काकडी आरती सोहळा भक्तीपूर्ण वातावरणात साजरा केला जात आहे.

बुधवारी (दि. 14) एमपीसी न्यूजचे संपादक विवेक इनामदार त्याचप्रमाणे ‘जीवन विद्या मिशन’ नाम संप्रदाय मंडळ, तळेगाव दाभाडेचे प्रमुख गंगारामशेठ गीते, सोनिगरा ज्वेलर्सचे प्रतिनिधी, ह.भ.प. पिराजी भोसले व यांच्या कुटुंबियांना आरतीचा मान देण्यात आला.

आरती मानकऱ्यांचा सन्मान रेणुका महिला भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आला.

यावेळी रामभाऊ माने, मल्हारी नीळकंठ, माऊली कुडाळकर, लता कुडाळकर, सिंधू नीळकंठ, विनायक कुडाळकर, रामेश्वरी कुडाळकर, आरती मोरे, संगीताताई लाखे, अलकाताई लाखे, अभि लाखे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.