Talegaon Dabhade: भाजप व अन्य संस्थांच्या वतीने 32 हजार गरजूंच्या दोन्ही वेळच्या भोजनाची व्यवस्था

तळेगाव शहर भाजपाचे अध्यक्ष रवींद्र माने व कार्याध्यक्ष महेंद्र पळसे यांची माहिती

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुकारलेल्या लाॅकडाऊनच्या 28 दिवसांच्या कालावधीमध्ये तळेगाव दाभाडे भारतीय जनता पक्ष, मावळ प्रखंड बजरंग दल, इस्काॅन व बजाज उद्योगसमूह यांचे संयुक्तपणे सुमारे 32 हजार नागरिकांना दुपारी व संध्याकाळी हातावर पोट असणारे, रोजंदारी, घरकाम करणा-या महिला, मजूर कामगार आदींना तयार जेवण देण्यात आल्याची माहिती तळेगाव शहर भाजपाचे अध्यक्ष रवींद्र माने व कार्याध्यक्ष महेंद्र पळसे यांनी दिली.

यामध्ये दुपारचे जेवण मावळ प्रखंड बजरंग दल, इस्काॅन व बजाज यांच्या वतीने तर रात्रीचे जेवण तळेगाव शहर भारतीय जनता पक्षाकडून देण्यात आले.

यासाठी माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, प्रभारी संतोष भेगडे पाटील, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, नगरसेवक अरूण भेगडे, शोभा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष रवींद्र माने, कार्याध्यक्ष महेंद्र पळसे, सरचिटणीस विनायक भेगडे, रवींद्र साबळे, सचिन टकले, सुनील ब. भेगडे,अजय भेगडे, सतिश राऊत, सचिन जाधव, सुनील कांबळे,सतिश चौधरी, शोभा परदेशी, योगेश लांडे, दीपक चव्हाण, सोपान जाधव, सिध्दार्थ माने, दीपक भेगडे यांच्यासह कैकाडी समाज मंदिर, श्री छत्रपती मित्र मंडळ यामधील कार्यकर्ते  यांनी जेवण वाटप केले.
या कालावधीत नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून गॅस एजन्सीना वेळेवर सिलिंडर पुरवठा करण्याबाबत, तसेच महावितरण कार्यालय प्रमुख, रेशनिंग दुकानदार आदींना नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याबाबत तळेगाव शहर भारतीय जनता पक्षाकडून निवेदन देण्यात आल्याची माहिती सरचिटणीस विनायक भेगडे यांनी दिली.

भाजप युवा मोर्चातर्फे गरोदर महिला व ज्येष्ठांना मदत

तळेगाव दाभाडे भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून युवा अध्यक्ष माधव भेगडे व विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष शुभम कुल यांच्या प्रयत्नातून गरोदर महिला व वृद्धांना  कोणत्याही कारणास्तव बाहेर पडायला लागू नये म्हणून सर्व गरजूंना संपर्क नंबर देऊन त्यांना लागणारी कोणतीही मदत घरपोच देण्यात आली आहे. साधारणपणे 190 गरजूंनी या उपक्रमातून आपली गरज भागवली. या सर्व कार्यातून गरजूंकडून तोंड भरून कौतुक होत आहे. या सर्व सेवा अशाच पुढे चालू ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.