Talegaon Dabhade : अरुण माने यांची तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते पदी निवड

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अरुण बबनराव माने यांची राष्ट्रवादी काँग्रेस शहर प्रवक्ते पदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, तालुक्याचे आमदार सुनिल शेळके, तालुक्याचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या हस्ते अरुण माने यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष साहेबराव कारके, तालुका राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष किशोर सातकरसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

आपली राष्ट्रवादी कॉंग्रेसशी असलेली सामाजिक बांधिलकी आणि आतापर्यंत आपण सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या प्रामाणिक कामाची नोंद घेऊन आपली राष्ट्रवादी तळेगाव शहर प्रवक्तेपदी  पदावर निवड करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी नियुक्तीपत्रात म्हटले आहे.

नवनिर्वाचित प्रवक्ते अरूण माने  यांनी अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठेने काम केले असून त्यांच्या निष्ठेचे आज फलित झाले.

माने हे उत्कृष्ट संघटक म्हणून ओळखले जातात. तळेगाव नगरपरिषदेतील एक अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख असून राजकीय, सहकार, शैक्षणिक, कला, क्रिडा, सामाजिक अशा विविध क्षेत्रात ते कार्यरत आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुरोगामी विचार व कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचे काम  करण्यासाठी आमदार सुनिल शेळके व पक्षातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने आणि सर्वांच्या सहकार्याने, प्रामाणिक प्रयत्न राहील असा विश्वास माने यांनी यावेळी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.