Talegaon Dabhade : नगरसेवक माहिती अधिकार कार्यकर्ते अरुण माने यांना उत्कृष्ट आरटीआय कार्यकर्ता पुरस्कार

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक माहिती अधिकार कार्यकर्ते अरुण बबनराव माने यांना केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी यांच्या हस्ते उत्कृष्ट आरटीआय कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

26 जानेवारी रोजी आरटीआय एक्टिव्हिस्ट फोरम मुंबई यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी फोरमचे अध्यक्ष सुधाकर कश्यप, केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी उपस्थित होते. अरुण माने यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व माहिती अधिकारात उल्लेखनीय कार्य केले आहे. अरुण माने हे कामगारांच्या हक्कासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी, अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवित आहेत असे फोरमचे अध्यक्ष सुधाकर कश्यप यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.