Talegaon Dabhade : असवले इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन

एमपीसी न्यूज- राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ संचालित बाळराजे असवले इंग्लिश मिडीयम स्कूल आणि सरपंच चिंधु मारुती असवले इंग्लिश मिडीयम हायस्कुलच्या विस्तारित इमारतीचे उद्‌घाटन आमदार संजय बाळा भेगडे, पुणे जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे दहावे वार्षिक स्नेहसंमलेन मोठ्या उत्साहात पार पडले.

यावेळी तळेगाव नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते गणेश भेगडे, माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, भाजपा तालुका अध्यक्ष प्रशांत ढोरे, माजी सभापती अतिष परदेशी, टाकवे ग्रामपंचायत सरपंच सुप्रिया मालपोटे, मंगरूळ सोसायटीचे चेअरमन रुपेश घोजगे, उपाध्यक्ष मनोज जैन, खजिनदार तानाजी असवले, संचालक स्वामी जगताप, पांडुरंग मोढवे, लक्ष्मण कुटे आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागातून ही एकमेव आदर्श शाळा म्हणून उदयास येत आहे. शाळेच्या योग्य नियोजनाबद्दल बाळासाहेब नेवाळे यांनी संचालक मंडळाचे विशेष कौतुक केले. आमदार बाळा भेगडे म्हणाले की, मावळच्या विकासासाठी आम्ही सर्वजण एकत्र असल्याचे मत व्यक्त केले. दरम्यान शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांना सन्मानित करण्यात आले तसेच शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरविण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी विविध नृत्य, नाटक सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली. पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष शिवाजी असवले यांनी केले. प्रास्ताविक सचिव रामदास वाडेकर यांनी केले. सूत्रसंचालन संचालक राजु खांडभोर यांनी तर आभार मुख्याध्यापक किरण हेंद्रे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.