Talegaon Dabhade : मुलींच्या चार वसतिगृहांना इनरव्हील क्लबकडून तेल डब्यांची मदत

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहरातील मुलींच्या चार वसतिगृहांना (Talegaon Dabhade) इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे प्रत्येकी दोन तेलाचे डबे देण्यात आले. वसतिगृहांनी मागणी करताच इनरव्हील क्लबकडून तेल डब्यांची मदत सुपूर्त करण्यात आली.

 

तळेगाव दाभाडे येथील मुलींचे वसतिगृह अनुक्रमे 1  संजीविनी मुलींचे वसतिगृह, 2 उद्योगधाम कन्या वसतिगृह, 3 स्व. वि.  दा. सावरकर गुरुकुल, 4 माई बालभवन दृष्टिहीन मुलींचे वसतिगृह या सर्वांची मागणी लक्षात घेता प्रत्येकी 2 तेल डब्बे संस्थांना भेट देऊन तेथील व्यवस्थापकांना सुपूर्त करण्यात आले.

Nigdi : महिला दिनानिमित्त रंगणार ‘नवंकोरं’ हा कविता,गझल व गप्पांचा कार्यक्रम

या वेळी अध्यक्षा वैशाली दाभाडे, प्रकल्प प्रमुख मुग्धा जोर्वेकर, मीरा बेडेकर, ममता मराठे, माया भेगडे व सुनंदा काळोखे या क्लबच्या सदस्या उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.