Talegaon : तळेगाव स्टेशन चौकाला किशोरभाऊ आवारे यांचे नाव द्यावे – प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील (Talegaon) रेल्वे स्टेशन चौकाला दिवंगत जनसेवक किशोरभाऊ आवारे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे सचिव प्रदीप नाईक यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडे केली आहे. 

यासंदर्भातील लेखी निवेदन तळेगाव नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यावेळी जनसेवा विकास समितीचे महेश पवार तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रतीक भालेराव, अक्षता सेठीया, वृषाली धोत्रे आदी उपस्थित होते.

नाईक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कै. किशोर आवारे हे भूमीपुत्र होते. त्यांनी तळेगाव दाभाडे शहरासाठी अनेक कामे केली आहेत. कोरोना काळात देखील त्यांनी अनेक गरजूंना मदतीचा हात दिला आहे. तळेगाव शहराच्या कचऱ्याचा, भाजी मंडईचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला.

PCMC : वायू प्रदूषणाबाबत योग्य त्या उपाययोजना करा; नागरिकांची जनसंवाद सभेत मागणी

त्यांनी केलेले कार्य नागरिक कधीच विसरू शकणार नाहीत. त्यांनी केलेल्या या कार्याचा सन्मान म्हणून नगरपरिषदेने तळेगाव स्टेशन चौकाला किशोरभाऊ आवारे चौक असे नाव देण्यात यावे अशी मागणी नाईक यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.