Talegaon Dabhade : अथर्व अॅक्सिडेंट हाॅस्पिटलच्या नूतन इमारतीचे रविवारी उदघाटन

एमपीसी न्यूज- अथर्व अॅक्सिडेंट हाॅस्पिटलचा विस्तार नवीन एनएबीएच अॅक्रिडिटेड अथर्व मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल अॅण्ड जाॅईंट रिप्लेसमेंट सेंटरच्या रूपात होत आहे. नूतन इमारतीचे उद्दघाटन रविवारी (दि. 2) दुपारी 3 वाजता सुप्रसिद्ध आर्थोपेडिक तज्ञ डाॅ. के. एच. संचेती यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती अथर्व हाॅस्पिटलचे संचालक डाॅ अजित माने व डाॅ राजेंद्र देशमुख यांनी दिली आहे.

हा कार्यक्रम नूतन विद्या पाॅलीटेक्नीक काॅलेज मैदान, अथर्व हाॅस्पिटलजवळ, तळेगाव- चाकण महामार्ग, तळेगाव स्टेशन या ठिकाणी होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णराव भेगडे, शिक्षणतज्ज्ञ, लेखक डाॅ एम.ए. शेख, मुख्यमंत्र्यांचे सचिव सिद्धेश्वर मोकाशी, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डाॅ राजीव अरोरा, ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डाॅ सुहास कांबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या निमित्ताने केंद्र सरकारच्या विविध आरोग्य योजनांचा प्रारंभ माजी राज्यमंत्री बाळा भेगडे तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा प्रारंभ आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सर्व योजना आता या रुग्णालयात उपलब्ध करण्यात येणार आहेत. विविध स्वरुपातील वैद्यकिय उपचारांसाठी आवश्यक त्या सर्व शाखांच्या अनुभवी तज्ज्ञ डाॅक्टरांची उपलब्धता व अत्याधुनिक यंत्रणा या नूतन अद्ययावत व उपकरणांनी नवीन सुसज्ज असलेल्या इमारतीत करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.