Talegaon Dabhade : प्रा अविनाश पाटील यांना बुंदेलखंड विद्यापीठाची पीएचडी

एमपीसी न्यूज- डी वाय पाटील स्कुल ऑफ इंजिनिअरिंग अकॅडमी तळेगाव आंबी येथील प्रा. अविनाश गोपाल पाटील यांना मेकॅनिकल इंजिनीरिंग या विषयांत बुंदेलखंड विद्यापीठ, झांशी, या विद्यापीठाची पी एच डी प्रदान करण्यात आली.

डॉ अविनाश पाटील यांनी “फेल्युअर अनॅलिसिस ऑफ AISI 4140H बाय फ्रेकॅचर मेकॅनिक्स” या विषयावर शोधनिबंध सादर केला.

या निमित्ताने डी वाय पाटील संस्थेच्या ऑटोमोबाईल विभागाच्यास वतीने डॉ अविनाश पाटील यांचा प्राध्यापकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विभागाचे सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

डॉ अविनाश पाटील यांच्या संशोधन कार्यात डी वाय पाटील एज्युकेशनल अकॅडेमीचे संस्थापक डॉ. डी वाय पाटील आणि संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश खेर्डे, प्रशासकीय अधिकारी भवानराव गायकवाड आणि रजिस्ट्रार अशोक पाटील यांचे सहकार्य लाभले. डॉ अविनाश पाटील यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांच्या प्रगतीसाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या डी वाय पाटील संस्थेचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.