Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयात गर्भाशयाचा कर्करोग आणि एचपीवी लस बाबत जनजागृती

एमपीसी न्यूज – इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे, मेधावीण फाउंडेशन व इंद्रायणी महाविद्यालय (Talegaon Dabhade ) यांच्या संयुक्त विद्यमाने इंद्रायणी महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी गर्भाशयाचा कर्करोग आणि त्यावर प्रतिबंधक एचपीवी लस याबाबत जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. डॉ. रेणुका पारवे यांनी विद्यार्थिनींना सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले.

 

 

 

Bhosari News : वीज बिलांच्या तक्रारीबाबत उद्योग सेनेचे महावितरणकडे निवेदन   

आजचा कार्यक्रम हा पहिला टप्पा असून आपण पुढील टप्प्यात लसीकरण करणार आहोत तरी सर्व विद्यार्थिनींनी जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरणास प्रतिसाद द्यावा असे आवाहन वैशाली दाभाडे यांनी केले

प्राचार्य डॉ संभाजी मलघे, बीबीए बीसीए विभागप्रमुख प्रा विद्या भेगडे, डॉ क्रांती इंगळे, निशा पवार, मुग्धा जोर्वेकर, ममता मराठे,आरती भोसलेसह सर्व प्राध्यापिका व महाविद्यालयातील विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

 

प्रास्ताविक अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी केले,प्राचार्य डॉ संभाजी मलघे  यांनी मनोगत (Talegaon Dabhade ) व्यक्त करताना क्लब करत असलेल्या कामाचे कौतुक केले.    राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा दीप्ती पेठे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन प्रा डिंपल सावंत यांनी केले तर प्रा संध्या बारंगोळे यांनी आभार मानले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.