रविवार, सप्टेंबर 25, 2022

Talegaon Dabhade : शहर काँग्रेसकडून आझाद गौरव यात्रा

एमपीसी न्यूज – तळेगाव (Talegaon Dabhade)
शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तळेगाव दाभाडे शहरात स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनिमित्त आझाद गौरव यात्रा काढण्यात आली. आझाद गौरव यात्रेची  सुरुवात जिजामाता चौक येथून झाली. ही यात्रा पुढे सुभाष चौक, शाळा चौक, राजेंद्र चौक, तेली आळी चौक, मारुती मंदिर मार्गे सुशीला मंगल कार्यालय इथपर्यंत काढण्यात आली. सुशीला मंगल कार्यालयात यात्रेचा समारोप करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे, निखिल कवीश्वर, चंद्रकांत सातकर, बाळासाहेब ढोरे, विलास मालपोटे, गणेश काजळे, पृथ्वीराज पाटील, श्रीमंत सरदार संध्याराजे दाभाडे, माऊली दाभाडे, यशवंत मोहोळ, विलास जाधव, दिलीप कुल, वैष्णवी झगडे, शैलेश मखमले, राजेंद्र खळदे, अमर खळदे, संकेत खळदे, भूषण खळदे, शुभम खळदे, आईशा खान, निनाद हरपुडे, कौस्तुभ ढमाले, दिलीप ढमाले, विजय काशीद, अक्षय पोटे, प्रभाकर ओंकार, आनंद मोरे, सुधीर भोंगाडे संपत दाभाडे, हाजीमलंग मारिमुथू आदी उपस्थित होते.
यावेळी देशाच्या (Talegaon Dabhade) अमृत महोत्सव स्वातंत्र्य वर्षी देशावरील गाणी रथयात्रेमध्ये लावण्यात आली.  याप्रसंगी बोलताना देविदास भन्साळी यांनी काँग्रेस पक्षाचे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी किती योगदान आहे हे सांगितले. मी सुद्धा स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा आहे असे त्यांनी सांगितले. आत्ता लोक स्वतःच्या फायद्यासाठी पक्षांतर करतात पण ते फार काळ टिकत नाही. काँग्रेस पक्षाने देशाला काय बलिदान दिले हे त्यांनी त्यांच्या भाषणातून सांगितले.
तळेगाव युवक अध्यक्ष विशाल वाळुंज यांनी स्वागत
केले. प्रास्ताविक तळेगाव शहर अध्यक्ष यादवेंद्र खळदे यांनी केले. सूत्रसंचालन शुभांगी शिंदे यांनी केले, तर आभार माजी नगराध्यक्ष राजेंद्र पोळ यांनी मानले.
spot_img
Latest news
Related news