BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : नवलाख उंबरे विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बबन जाधव यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज- नवलाख उंबरे विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बबन जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चंद्रकांत शेटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक घेण्यात आली.

अध्यक्षपदासाठी बबन जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विनोद कोतकर यांनी काम पाहिले.

यावेळी संस्थेचे संचालक तथा सरपंच दत्तात्रय पडवळ, संचालक तानाजी पडवळ, श्रीधर शिंदे, दिलीप जगनाडे, दिनकर शेटे, नवनाथ पडवळ, बाळासाहेब बधाले, हनुमंत बधाले, सचिव गुलाब ढोरे, सहसचिव श्रीहरि शेटे आदी उपस्थित होते.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3