Talegaon Dabhade : नवीन समर्थ विद्यालयाचे पर्यवेक्षक बाबाराव अंभोरे यांना राज्यस्तरीय कृतिशील शिक्षक पुरस्कार

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या 2018- 2019 या शैक्षणिक वर्षातील विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल मावळ विभागातून शिक्षकांमध्ये तळेगाव दाभाडे येथील नवीन समर्थ विद्यालयाचे पर्यवेक्षक बाबाराव अंभोरे यांना तसेच मुख्याध्यापकांमधून आमदार प्रकाश देवळे माध्यमिक विद्यालय शिरगांव मावळ या शाळेतील मुख्याध्यापक रमेश फरताडे यांना राज्यस्तरीय कृतिशील शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

रविवारी (दि 5) पंढरपूर येथे विधान परिषदेचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांचे हस्ते अंभोरे यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष शंकर धावणे, श्री तांबोळी, कदमबांडे, खोसे आदी उपस्थित होते.

अंभोरे यांना आजपर्यंत विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हास्तरीय पुरस्कार, काव्यमित्र पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय साने गुरुजी संस्कारक्षम शिक्षक पुरस्कार; तसेच डोळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने स्वामी विवेकानंद गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन अंभोरे यांना गौरविण्यात आले आहे. त्याचबरोबर विविध चॅनेलवर गणित विषयावर व्याख्यान, विज्ञान प्रदर्शनात सक्रिय सहभाग घेतला.

ग्रामीण भागातील वेगवेगळ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणिताचे मार्गदर्शन, शिक्षकांना मार्गदर्शन, एसएससी बोर्डाच्या परीक्षेत उत्तम नियोजन, सर्वांना एकत्र करून काम करण्याची वृत्ती शिक्षकप्रिय व विद्यार्थी प्रिय सरांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, शालेय समितीचे अध्यक्ष महेशभाई शहा, मुख्याध्यापक कैलास पारधी, ज्येष्ठ अध्यापक पांडुरंग पोटे, सुदाम वाळुंज व सर्व शिक्षक सहका-यांनी त्यांचे विशेष कौतुक आणि अभिनंदन केले.

Babarao AMbhore
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like