Talegaon Dabhade : आंबी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बाबासाहेब घोजगे बिनविरोध

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील आंबी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते बाबासाहेब गणपतराव घोजगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आधीच्या उपसरपंच सुवर्णा नखाते यांनी कार्यकाल संपल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली.

सरपंच बायडाबाई ज्ञानेश्वर गराडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन केले होते. बाबासाहेब घोजगे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक बी जी सुरवसे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.

त्यावेळी माजी सरपंच वामनतात्या वारींगे, सदस्या जयश्री घोजगे, किसन शिंदे, रवींद्र घोजगे, माजी सरपंच नंदा घोजगे, सोनाली बनसोडे, जयश्री लंके, माजी उपसरपंच सुवर्णा नखाते आदी सदस्य व ज्येष्ठ उद्योजक शंकर शेळके, केशव दाभाडे, पोलीस पाटील भानुदास दरेकर, बबनराव घोजगे (कारभारी), हभप विष्णू दरेकर, माजी सरपंच सोपान शिंदे, माजी सरपंच अलका जाधव, माजी उपसरपंच भरत घोजगे, चंद्रकांत घोजगे, माजी उपसरपंच नंदकुमार घोजगे, प्रसिद्ध निवेदक नानासाहेब घोजगे, समाज भूषण धोंडीभाऊ घोजगे, पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस समीर जाधव, गोविंद दरेकर, अशोक घोजगे, हभप दत्तात्रय बबन घोजगे, प्रदीप बनसोडे, राहूल बनसोडे, बाळा दत्तु बनसोडेसह ग्रामस्थ, संघर्ष ग्रुप, मुकुंद तरूण मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी विजयी मिरवणूक काढण्यात आली. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.