Talegaon Dabhade : बजरंग दलाचा दिवाळी स्नेहसंगम उत्साहात

एमपीसी न्यूज- विश्व हिंदु परिषद व बजरंग दल मावळ तालुक्याच्या वतीने आंदर मावळ मधील अतिदुर्गम भागात सावळे गावच्या वाड्या वस्त्या तसेच कुसवली गावात दीपोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात बजरंगदलाचे शेकडो कार्यकर्ते, बहुसंख्येनेे आदिवासी समाज, आसपासच्या गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

या वर्षीचा कार्यक्रम सावळा येथील मेठलवाडी येथे शनिवारी तर कुसवली येथे रविवारी घेण्यात आला. या उत्सवात आद्य क्रान्तिकारी उमाजी नाईक, राघोजी भांगरे, भगवान बिरसा मुंडा, तंट्या भिल, बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी करुन समाज्यापुढे नवीन आदर्श निर्माण केला.या उत्सवात प्रत्येक घरापुढे रांगोळी काढण्यात आली. घरापुढे पणत्या लावण्यात आल्या. गावातील प्रत्येक लहानग्यांना फटाके देण्यात आले. घरावर छत्रपति शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला ध्वज लावण्यात आला. घराघरात मिठाई देण्यात आली सर्वांनी एकत्र येऊन स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला .

या कार्यक्रमासाठी जेष्ठ बजरंगदल कार्यकर्ते संतोष भेगडे पाटील यांनी मार्गदर्शन केले. सर्व कार्यकर्ते ग्रामस्थांना जातीपातीच्या जोखडातुन मुक्त होऊन एकत्र येण्याचा संदेश त्यांनी दिला. यावेळी रविंद्र भेगडे, अशोक थोरात यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी विश्व हिंदु परिषद व बजरंगदलाचे पदाधिकारी धनाजी शिंदे, संदेश भेगडे, अमीत भेगडे, गोपिचंद कचरे उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब खांडभोर, सुशील वाडेकर, महेंद्र असवले, बळिराम शिंदे ,अजित शेलार , प्रशांत भेगडे, गणेश कुडे, योगेश खांडभोर तसेच अनेक बजरंगदलाच्या कार्यकर्तांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला 19 वर्षाची अखंड परंपरा आहे आता पर्यंत मावळ मधील दुर्गम भागातील 125 वाड्या वस्त्या बजरंगदलाच्या संपर्कात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.