Talegaon Dabhade : बकरी ईद उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशन मस्जिदमध्ये उत्साहात व पारंपरिक रीतिरिवाजानुसार बकरी ईद साजरी करण्यात आली.

सकाळी साडेसात वाजता मौलाना शाहीद सिकिलकर यांनी व साडेआठ वाजता वाजता मौलाना सलमान यांचे मार्गदर्शना खाली दोन सत्रात सामूहिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी मोठया संख्येने मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी उपस्थित होते. मौलाना शाहिद यांनी सामाजिक सलोखा आणी ईश्वरा प्रति निष्ठा राखण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी सांगली व कोल्हापूर मधील पूरग्रस्त नागरिकांना आर्थिक तसेच जीवनावश्यक वस्तूची मदत करण्यासाठी ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष आयुब सिकिलकर यांनी आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत रोख स्वरूपात एक लाख रुपये जमा झाले .

यावेळी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वाघमोडे ,गावडे मॅडम व त्यांचे सहकारी यांनी त्याच प्रमाणे इतर समाज बांधवानी ईद निमित्त मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या.

यावेळी ट्रस्टचे विश्वस्त बाबा मुलानी , जमीर नालबंद, राजू अत्तार, आयुब मणेर, नदीम शेख, इरफान जमादार ,अस्लम शेख त्याचप्रमाणे डॉ मुबारक खान, नाझीम अत्तार, सय्यद पाशाभाई, अब्दुल हाफीसभाई, जलालखान अलमेल, शमीम खान, सलमान अत्तार, नौशाद शेख, इब्राहिम शेख, इम्रान शेख तसेच मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2