Talegaon Dabhade : बाळा भेगडे मुंबईला रवाना !

एमपीसी न्यूज – देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मावळ तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील भाजपचे नेते व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे हे तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेगडे यांना तातडीने मुंबईला बोलावून घेतल्याची चर्चा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये होती. नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना मुंबईत वेग आलेला असताना भेगडे मुंबईला रवाना झाल्याने उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

यासंदर्भात ‘एमपीसी न्यूज’ने भेगडे यांच्याशी संपर्क साधला असता, मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना बोलावून घेतल्याच्या चर्चेचा त्यांनी इन्कार केला. पुन्हा मुख्यमंत्री झाल्याबद्दल फडणवीस यांचे अभिनंदन करण्यासाठी आपण मुंबईला आलो आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.