Talegaon Dabhade: भारतीय किसान संघाचे तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब बासरकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – मावळ तालुका भारतीय किसान संघाचे उपाध्यक्ष व नवलाख उंबरे गावचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष बाळासाहेब उर्फ कृष्णाजी बासरकर गुरुजी (वय ८३ वर्षे ) यांचे वृध्दापकाळाने नुकतेच निधन झाले.

बासरकर गुरुजी यांच्या मागे पत्नी,भाऊ, दोन  मुले, एक मुलगी, पुतणे,नातवंडे असा परिवार आहे.

जिल्ह्यात परिणामकारक ठरलेली दारुबंदी यशस्वी करणारे शिक्षक म्हणून जिल्ह्यात त्यांची ओळख आहे. वेदिका हाॅलिडे कंपनीचे संचालक रवी बासरकर यांचे ते चुलते होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.