BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : सुदुंबरे गावच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादीचे बापूसाहेब दरेकर यांची बिनविरोध निवड

409
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या सुदुंबरे गावच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बापूसाहेब सोपान दरेकर यांची बिनविरोध निवड झाली. जालिंदर गाडे यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेण्यात आली.

उपसरपंच पदासाठी बापूसाहेब दरेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक शरद ढोले यांनी केली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच संगीता गाडे होत्या. यावेळी जालिंदर गाडे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण गाडे, कांताबाई गाडे, निकिता गाडे, उमाताई शेळके, लक्ष्मण भांगे, भारती आंबोले, मोनाली दिवेकर, आशाताई गाडे , सीताबाई केदारी आदी उपस्थित होते.

नवनिर्वाचित उपसरपंच बापूसाहेब दरेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून सुदुंबरे राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष आहेत. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी बापूसाहेब दरेकर यांची ढोल ताशांच्या गजरात गावातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

त्यानंतर सिद्धेश्वर मंदिर पटांगणात जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी माजी सरपंच माणिक गाडे, माजी उपसरपंच सुरेश गाडे, मोहन काळडोके, राजेंद्र गाडे, जालिंदर गाडे, संतोष खंडू गाडे, तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुनील भोंगाडे, माजी कार्याध्यक्ष शिवाजी असवले, मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक राज खांडभोर, ग्रामपंचायत सदस्या उमाताई शेळके, सुदुंबरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिक बाजीराव गाडे, महिला अध्यक्षा माधुरी गाडे, कृषीनिष्ठ पुरस्कारप्राप्त नारायण दरेकर, सुदवडी गावचे ग्रामपंचायत सदस्य रमेश कराळे, माजी ग्रामपंचायत सदस्य बाबा सावंत यांच्यासह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादी युवकचे सुरजबाळा गाडे, बाळा आंबोले,ताराचंद गाडे, दादा बेल्हेकर, अभय गाडे, शरद काळडोके यांनी केले.
दरम्यान, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले, युवकचे तालुकाध्यक्ष सुनील दाभाडे, तळेगाव शहर राष्ट्रवादी
काँग्रेसचे अध्यक्ष गणेश काकडे, नगरसेवक संतोष भेगडे, शेखर मु-हे आदींनी दरेकर यांना शुभेच्छा दिल्या.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.