Talegaon Dabhade : वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे तळेगाव परिसरातील बत्ती गुल

एमपीसी न्यूज – तळेगाव शहर परिसरात गुरुवारी (दि. 16) सायंकाळी वादळी वाऱ्यासह ( Talegaon Dabhade) अवकाळी पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. तसेच काही ठिकाणी विजेचे खांब कोसळले.यामुळे शहर परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला.अवकाळी पावसामुळे बागायती पिकांचे नुकसान झाले. तर भात पिकाच्या पूर्व मशागतीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.

मेघ गर्जनेसह मावळ तालुक्यास अवकाळी पावसाने पुन्हा गुरूवारी (दि 16 ) चागंलेच झोडपून काढले.या पावसाचा जोर मावळ तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात अधिक होता. जोरात वादळी वारे वाहत असल्याने सर्वत्र बत्तीगुल झाली होती.मावळ तालुक्यातील सर्व भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने खरीप भातपिकाचे पूर्व मशागती करण्यास शेतकरी बांधवांना संधी मिळू शकेल.

Today’s Horoscope 17 May 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

गुरूवारी सायंकाळी साडेपाचनंतर तळेगाव, इंदोरी, नवलाख उंबरे, आंबी, वारंगवाडी, कातवी या भागात ( Talegaon Dabhade) जोरदार वादळीवा-यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.जोरदार वा-यामुळे वारंगवाडी येथे वीजेचे खांब पडले, विजेच्या तारा तुटल्या त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे सर्वत्र काळोखाचे साम्राज्य पसरले होते. तर जोरदार पाऊस कोसळत होता.

तासभर चाललेल्या या पावसाने पाणी पाणी झाले.सायंकाळी घरी येण्याची वेळ असल्याने व सर्वत्र बत्तीगुल झाल्याने नागरिकांना चांगलाच त्रास सोसावा लागला. या अवकाळी पावसाने विटभट्टीतील विटा भिजल्याने मोठे नुकसान झाले.तर पूर्व पट्ट्यातील  बागायती पिकांचे नुकसान होण्याची भिती निर्माण झाली आहे.

मावळ तालुक्याच्या सर्व विभागात या अवकाळी पावसाने हजेरी लावली. या हजेरीचे प्रमाण पश्चिम पट्यात कमी होते.तर पुर्वपट्यात अधिक होते. पुर्व भागातील काही गावामध्ये तर या अवकाळी पावसाने पाणी पाणी केले होते.

तळेगाव येथील लॅटिस सोसायटीमध्ये एमएसईबीच्या ट्रान्स्फार्मवर झाड उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. झाड बाजूला काढण्याचे काम सुरू असून लवकरच वीज पुरवठा सुरळीत होईल ,असे तळेगाव विभागाचे उप कार्यकारी अभियंता राजेंद्र गोरे ( Talegaon Dabhade) यांनी सांगितले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.