Talegaon Dabhade : सी.एम्.चषक 2018 स्पर्धेत कृष्णराव भेगडे शाळेचे घवघवीत यश

एमपीसी न्यूज- तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित, कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी खुल्या गटातील खो – खो स्पर्धेत मावळ तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला.

ही स्पर्धा 25 डिसेंबर रोजी इंद्रायणी महाविद्यालयात घेण्यात आली. मावळातील अनेक शाळांचे संघ या स्पर्धेसाठी उपस्थित होते. स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. प्रतिस्पर्धी संघ प्रगती विद्यामंदिर इंदोरी यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात कृष्णराव भेगडे शाळेच्या मुलांनी बाजी मारली. रोख रक्कम, प्रशस्तिपत्रक, व चषक बक्षीस म्हणून देण्यात आले.

आता या संघाची सी.एम्.चषक जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक गोरख काकडे व सुवर्णा झणझणे यांनी मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे, संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे, शाळेचे अध्यक्ष दिलीप भोगे, संस्थेचे इतर सभासद व शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर यांनी अभिनंदन केले व पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.