Talegaon Dabhade : जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये भेगडे स्कूलचा तृतीय क्रमांक

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा कार्यालय, शिवाजी विद्यालय सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडियम स्कूलला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.

या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे संघ सहभागी होते यामध्ये मावळ तालुक्याचे नेतृत्व कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलचा संघ करत होता. या स्पर्धेमध्ये विभागीय स्पर्धेसाठी शाळेतील पार्थ संदीप काकडे व सौरभ दिलीप पाटील या दोन खेळाडूंची निवड करण्यात आली. या सर्व खेळाडूंना त्यांचे क्रीडाशिक्षक गोरख काकडे, मयूर सांडभोर,विकास सुर्वे, मनी नायर व रोहित चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

सर्व विजयी खेळाडूंना संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे, अध्यक्ष संदीप काकडे, गौरी काकडे व इतर मान्यवर सभासद तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर यांनी अभिनंदन केले. पुढील कामगिरीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.